काश्मिरी पंडितांचे विस्थापन – सत्यामागचे कटू सत्य
काश्मिरी पंडितांचे विस्थापन – सत्यामागचे कटू सत्य काश्मिरी पंडितांचे विस्थापन! काश्मीरच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायक कालखंड! आधीच गुंतागुंतीचा असलेला काश्मीर प्रश्न ह्या काळ्या अध्यायाने आणखीनच बिकट बनला. जानेवारी 1990 मधील भयानक थंडीने थिजवून टाकणार्या त्या दहशतीच्या काळोख्या रात्री कश्मीरी पंडित कुटुंबं खचितच विसरतील. घरं-दारं, व्यवसाय- धंदे सारं सोडून मुला-बाळांसह एका अंधकारमय अनिश्चित भविष्याकडे सारी कुटुंबं लोटली गेली होती. काश्मिरी पंडितांवरचा हा अन्याय भाजप आणि आरएसएस आजवर एखाद्या राजकीय ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरत आले आहेत. मागील सरकारांच्या तथाकथित कमकुवतपणाकडे बोट दाखवण्यासाठी आणि समस्त भारतातील हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेषाची भावना निर्माण करण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी हेच ब्रह्मास्त्र वापरलं जातं. आज काश्मिरी जनतेचा आवाज पायदळी तुडवण्याच्या कृतीच्या समर्थानासाठी सुद्धा याच ब्रह्मास्त्राचा वापर केला जात आहे. म्हणूनच कश्मीरच्या इतिहासातील ही घटना तपासून पहावी लागेल. अशोक कुमार पांडेय यांनी “कश्मीरी पंडीत – बसने और बिखरने के 1500 सा...